
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
वन बुलढाणा मिशन आता ही यात्रा पुढील तालुक्यात जाणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन घेऊन संदीप शेळके जिल्हाभर फिरत आहेत, या परिवर्तन रथयात्रेने जिल्ह्याचा राजकारण ढवळून निघालय.
आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासाचे तीन तेरा वाजवल्याचा आरोप संदीप शेळके यांनी केलाय… मला एक संधी द्या, जिल्ह्याचा कायापालट करून दाखवतो अशी साद संदीप शेळके घालत आहेत. दरम्यान परिवर्तन रथयात्रे दरम्यान संदीप शेळके गळ्यात मृदंग घालून विठू नामाचा गजर करताना दिसले आपण हाडाचे वारकरी आहोत, पंढरीचे वारकरी आहोत… विठू नामाचा गजर केला की सारा शिणभाग उतरतो.. जिल्ह्याच्या विकासासाठी विठुराया देखील आपल्या पाठीशी असल्याचे संदीप शेळके म्हणाले.



