मराठी पूर्व माध्यमिक शाळेत 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने संविधान अमृत महोत्सव साजरा… जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी..

मौजे जनुना तालुका खामगाव येथे 6 डिसेंबर रोजी स्थानिक मराठी पूर्व माध्यमिक शाळेत भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ अस्मिता ताई गवांदे तर उपसरपंचश्री. दवंगे प्रमुख उपस्थिती विस्तार अधिकारी श्री .घुगे सर ,संविधान तज्ञ अँड दाभाडे सर, मुख्याध्यापक, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष संदीप सुळोकार सह मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच यांनी पुष्पगुच्छ हार अर्पण केले. व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विस्तार अधिकारी श्री. घुगे सर यांनी भारतीय संविधानाबद्दल विशेष सखोल माहिती दिली तसेच संविधान तज्ञ अँड दाभाडे सर यांनी तर विशेष सविधांनावर बारकाईने माहिती दिली. या कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा महिलावर्ग अंगणवाडी सेविका आशा सेविका सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गावंडे सर यांनी केले…✒️



