मोमीनाबादच्या संदिप कळमकार यांची पारा कमांडोमध्ये निवड

प्रतिनिधी :अरुण सुरवाडे
मोमीनाबाद (ता. नांदुरा, जि. बुलढाणा) येथील संदिप ज्ञानदेव कळमकार या युवकाची भारतीय सैन्याच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा पारा कमांडो दलामध्ये निवड झाली आहे. गरीब कुटुंबातील असलेल्या संदिपने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
संदिप कळमकार यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले असून, लहानपणापासूनच त्यांना देशसेवेची आवड होती. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी आपले शिक्षण आणि शारीरिक तयारी सुरू ठेवली. अनेक अडथळ्यांना सामोरे जात त्यांनी अखेर पारा कमांडोमध्ये स्थान मिळवले.
संदिपच्या या यशामुळे मोमीनाबाद गावासह संपूर्ण नांदुरा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनीही त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
संदिप कळमकार यांचे हे यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून, कठोर परिश्रम आणि ध्येयवेड असले की यश नक्की मिळते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.



