मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी बऱ्याच वर्षापासून ची मागणी आहे. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाच्या अनेक मुलांना उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे समाजाची अवस्था बिकट झाली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केले.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे यांनी. सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ 8 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज बांधवांनी येथील डॉ महाजन हॉस्पिटल समोर सुरू केलेल्या उपोषण स्थळी भेट देऊन त्यांनी आपला पाठिंबा दिला. जयश्री शेळके म्हणाल्या, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हे आरक्षण लागू करण्या मागची संकल्पना आहे. त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी समाज बांधवांनी उपोषण सुरू केले. समाज त्यांच्या योगदानाची नक्कीच जाणीव ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रमुख मागण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी सुनील कोल्हे, रावसाहेब देशमुख, अमोल देशमुख, शुभम घोगटे, निलेश सोनुने,ओम प्रकाश बोर्डे यांनी उपोषण सुरू केले. दरम्यान दररोज तालुक्यातील समाज बांधव साखळी उपोषणात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.



