भीमजयंतीनिमित्त नियोजन बैठक उत्साहात संपन्नरमेश श्रावण झनके अध्यक्ष, करण विनोद झनके उपाध्यक्ष, साजन मोरे कोषाध्यक्ष

मलकापूर (प्रतिनिधी) : धरणगाव येथील करुणा बुद्ध विहार येथे आज दि. १ मार्च २०२६ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीत येऊ घातलेल्या भीमजयंती उत्सवाचे नियोजन, विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच जयंती यशस्वी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वर्गणी संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून समाजबांधवांच्या सक्रिय सहभागातून यंदाची भीमजयंती उत्साहात व एकोप्याने साजरी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
या प्रसंगी जयंती समितीची निवड करण्यात आली. त्यानुसार —
रमेश श्रावण झनके यांची अध्यक्षपदी, करण विनोद झनके यांची उपाध्यक्षपदी तर साजन मोरे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसेच सदस्य म्हणून निलेश वि. झनके, अमोल स. झनके, सागर बा. झनके, साहिल नि. बागडे, आर्यन गौ. झनके, सुमेध सरकाटे व आशिष इंगळे यांची निवड करण्यात आली.
बैठकीस समाजातील बांधव करुणा नवयुवक मंडळ चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी भीमजयंती मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने व सामाजिक ऐक्याचा संदेश देत साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला.



