बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामार्फत ‘माहिती अधिकार’ जनजागृती मोहीम संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज, २८ सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा शहरात विविध ठिकाणी ‘माहितीचा अधिकार अधिनियम २००५’ अंतर्गत व्यापक जनजगृती मोहीम राबवण्यात आली. “माहितीचा अधिकार – पारदर्शक शासन, सशक्त नागरिक… जाणून घ्या, मागा, वापरा…” आणि “माहितीचा अधिकार हेच तुमचे अधिकार” हा संदेश देत सामान्य नागरिकांना या कायद्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे सर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. देऊळगाव राजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात वाचक पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरेश जารवाल आणि पोलीस अंमलदार श्री. गजानन राठोड यांनी शहरातील मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे आणि बस स्टँड परिसरामध्ये थेट नागरिकांशी संवाद साधला.

या जनजागृती मोहिमेदरम्यान पोलीस पथकाने नागरिकांना माहिती अधिकाराचे महत्त्व पटवून दिले. “माहितीचा अधिकार म्हणजे काय?” हे सोप्या भाषेत समजावून सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, हा शासनाच्या कामकाजाची माहिती मिळवण्याचा नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. याद्वारे शासकीय कार्यालयातील कागदपत्रे, निर्णय, आकडेवारी आणि विविध शासकीय योजनांची अचूक माहिती मिळवता येते. देशातील प्रत्येक नागरिकाला हा अधिकार प्राप्त असून, प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी या हक्काची योग्य माहिती घेऊन त्याचा वापर करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अर्जुन ठोसरे यांनी यावेळी केले.

बस स्टँड व चौकातील प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत माहिती अधिकाराची पत्रके व नियम समजून घेतले. या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्या हक्कांबद्दल मोठी जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button