बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गणरायाचे जयघोषाने माळेगाव नगरी दुमदुमली विसर्जन मिरवणुकीत ५ गणेश मंडळांचा सहभाग

आवाज न्यायचा तेल्हारा तालुका प्रतिनिधी

संतोष रामकृष्ण गिऱ्हे

माळेगाव :-
गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोषाने शनिवार दिनांक २७/९/२०२६ रोजी माळेगाव नगरी दुमदुमली खूप दिवसापासून भक्ती भावाने गणरायाची सेवा आणि पूजा अर्चना केल्यानंतर हजारो गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला उत्साह भक्ती आणि शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेने पार पडली
गणेश उत्सवाच्या निमित्ताने गेल्या बारा दिवसापासून गावात धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते विविध गणेश उत्सव मंडळांनी गणरायाची आकर्षक रोषणाई धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शीतला माता गणेश मंडळाच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला गावात पाच गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला प्रत्येक मंडळाने आपापल्या पद्धतीने आकर्षक सजावट करून मिरवणुकीत सहभाग घेतला मुख्य बाजार चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली नर्सिंम्हा गणेश मंडळ अग्रस्थानी होता त्यानंतर जय बजरंग गणेश मंडळ चंफा माता गणेश मंडळ स्वस्तिक गणेश मंडळ इत्यादींनी सहभाग घेतला विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपारिक पद्धतीने वाद्यांचा वापर व गणरायांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते त्या भक्तिमय वातावरणामध्ये चौका चौकातून गणरायाची सामूहिक आरती करण्यात आली विसर्जन मिरवणूक मुख्य बाजार चौकातून शिवाजी चौकात चौक दुर्गा माता मंदिर बजरंग मंदिर मतजीत समोरून प्रस्थान करून गणरायाला विधिवत पूजन करून वांगेश्वर संस्थान त्रिवेणी संगम येथे गणरायाला शेवटचा निरोप दिला या मिरवणुकीत मध्ये तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष इंगळे सर त्यांचे सहकारी यांनी चोक बंदोबस्त ठेवला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button