भाजपा वैद्यकीय आघाडीचा सामाजिक उपक्रम; डॉ. प्रवीण पाचपांडे हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर यशस्वी

मुक्ताईनगर | प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाचे नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मुक्ताईनगर उत्तर, दक्षिण तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. २२ जुलै) डॉ. प्रवीण पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला भाजपा पदाधिकारी, डॉक्टर, युवक आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताची टंचाई भासू नये, या सामाजिक उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. संकलित रक्त संजीवनी ब्लड बँक, फैजपूर येथे सुपूर्द करण्यात आले.यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रवीण पाचपांडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनसेवेला प्राधान्य देणारे नेतृत्व असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमातून गरजूंना मदत करणे हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली आहे.या कार्यक्रमास भाजपा जिल्हा महामंत्री प्रफुल जवरे, जिल्हा उपाध्यक्षा नजमाताई तडवी, भाजपा तालुकाध्यक्ष जयपाल बोदडे, मोहन महाजन, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष माधुरीताई पाटील, वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रवीण पाचपांडे, डॉ. सोपान पाटील, तालुका सरचिटणीस उमेश तायडे, पंकज कोळी, राजूभाऊ सावळे, चंद्रकांत भोलाणे, नगरसेवक नईम बागवान, सचिन पाटील, बाळा चिंचोले, बापू ससाने, बबलू सपधरे, सुमित झांबरे, कैलास वंजारी, अनिल मालचे, इनुस पटेल, जुबेर अली, मनोज जाधव आणि अनिस अहमद खान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रवीण पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय व बिगर-वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



