अपघात

ब्रेकिंग न्यूज, अकोला जिल्ह्यातील उरळ -निमकर्दा गावा दरम्यान प्रहार रुग्णवाहिकेचा भीषण अपघात!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी विजय घोडे

दि २३; अकोला जिल्ह्यातील उरळ ते निमकर्दा या गावा दरम्यान भीषण अपघात घडून आला . दुपारी ०२.०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांकडून प्राप्त झाली आहे या माहितीनुसार एका बजाज कंपनीच्या पल्सर या दुचाकी स्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला व नंतर ही वाहने रोडच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळले असे दिसून येते. अपघातग्रस्त वाहनामध्ये मालवाहक गाडी क्र. एम.एच.-३०. AV.३९५ पलटी झाली .आहे . तर दुसरी गाडी ही प्रहार पक्षाचे नाव असलेली हिवरखेड रुप. येथील रुग्णवाहिका असल्याचे चित्रफितीमध्ये दिसून येत आहे. या वाहनांचा हा भीषण अपघात घडून आला असुन यामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी आहे व चार चाकी वाहनातील प्रवाशी किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button