जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

कोरोनाची लस बनवणारी सिरम इन्स्टिट्यूट PM मोदींच्या पक्षाला पैसे देत होती; राहुल गांधींचा आरोप ठाणे

जिल्हा प्रतिनिधी: प्रफुल्ल पहूरकर स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

देशात कोरोना काळात किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती दिली जात नाही. या काळात ५० लाख लोक कोरोनामुळे मेले. जेव्हा कोरोनाने लोकांच्या मृतदेहांचे ढीग साचत होते. तेव्हा कोरोनाची लस तयार करणारी सिरम इन्स्टिट्यूट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला पैसे देत होती, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करणाऱ्या मोदींनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून जगातील सर्वांत मोठे खंडणी वसुलीचे रॅकेट चालवले, या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केला. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ शनिवारी ठाण्यात आली. जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कंपन्यांच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स आदींचा ससेमिरा लावायचा व त्यामुळे इलेक्टोरलबॉन्डच्यामाध्यमातून कंपन्या भाजपला कोट्यवधी रुपये देतात असे रॅकेट सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button