महाराष्ट्रसामाजिकसांस्कृतिक

ब्रह्माकुमारीज कडून पोलीस स्टेशन व नगर परिषद येथे रक्षाबंधन.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड:-प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय रिसोड च्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी रक्षाबंधन निमित्त शहरातील शासकीय कार्यालयात जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या. रक्षाबंधन सणाचे अध्यात्मिक महत्व सांगून ब्रह्माकुमारीज विद्यालयातून
दिले जाणारे अध्यात्मिक ज्ञान जाणून घेण्याचे उपस्थिताना आवाहन केले. आजच्या काळात प्रत्येक मनुष्य तणावग्रस्त झाला आहे वाढती स्पर्धा आणि धावत युग, अति अनावश्यक इच्छा, संबंधामधील अविश्वास आणि दुरावा यामुळे कुटुंब विभक्त आणि उध्वस्त होत आहेत. या परिस्थितीला बदलणयासाठी अध्यात्मिक ज्ञान हाच श्रेष्ठ उपाय असल्याचे मनोगत ज्योती दीदींनी व्यक्त केले.पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्यासह सर्व पोलीस बांधवाना दीदींनी राखी बांधली तर नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसह रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित राहून दीदींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला व मेडिटेशन सुद्धा केले. ब्रह्माकुमारीज मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांनी कार्यकर्माच्या नियोजनसंदर्भात महत्वपूर्ण योगदान दिले. तर रिसोड ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या सह संचलिका ब्रह्माकुमारी गीता दीदी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पोलीस कर्मचारी व नगर परिषद कर्मचारी यांनी दीदींनी स्वतः येऊन रक्षाबंधन सणाचे महत्व सांगितले व आध्यत्मिक ज्ञान दिले त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद दिले. दीदींनी सर्वांना ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा सात दिवसाचा मूलभूत कोर्स करण्याचे आवाहन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button