अपघातात जखमी झालेल्या ऍड. अजय निकम यांचे निधन; परिसरात शोककळा

टाकळी (प्रतिनिधी) : टाकळी येथील रहिवासी ऍड. अजय निकम यांचे अपघातानंतर उपचारादरम्यान निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दि. 7 एप्रिल 2026 रोजी झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
सुमारे 10 दिवस मृत्यूशी झुंज देत असताना अखेर दि. 17 एप्रिल 2026 रोजी रात्री 8.30 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या अकाली निधनामुळे टाकळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
ऍड. अजय निकम हे अत्यंत शांत स्वभावाचे, हसमुख आणि सर्वांशी नम्रतेने तसेच आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक व कायदे क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मोठा मित्रपरिवार असा आप्तवर्ग आहे. विविध स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.



