क्राईम

अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन, इसमाविरुद्ध गुन्हा दाखल; मलकापूर तालुक्यातील घटना!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी मलकापूर

मलकापूर : तालुक्यातील मौजे घिर्णी येथेअल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी महादेव लक्ष्मण राऊत या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर मलकापूर शहर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला.

तक्रारीनुसार, दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आरोपीने पीडितेला धक्का मारून “तुला १० तारखेला पाहून घेतो” अशी धमकी दिली. त्यानंतर तो घराच्या गच्चीवर जाऊन अश्लील इशारे करत डोळे मारत होता. तसेच, हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून पोलिसांनी अपराध क्रमांक ७०/२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ७४, ७८, ३५१ (२), ७९ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे करीत आहेत.1

  1. * ↩︎

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button