बोदवडमध्ये डिझेल वितरणावेळी पोलिस बंदोबस्ताची मागणी

बोदवड : शहरातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी आज बोदवड पोलिस स्टेशन येथे जाऊन माननीय पोलिस निरीक्षक (पीआय) यांना निवेदन दिले. सध्या डिझेल वितरण सुरू असताना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून काही ग्राहकांकडून डिझेल वितरक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली.
पंप चालकांनी सांगितले की, इंधन वितरणाच्या वेळी कर्मचाऱ्यांना व चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेल वितरणावेळी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच बोदवड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय करण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना अनिलशेठ खंडेलवाल, वैभव शेठ बरडिया, अजय शेठ बडगुजर, मोहित शेठ अग्रवाल व विशाल शेठ बरडिया उपस्थित होते.



