शंभर चे मुद्रांक बंदीची ॲक्शन !पाचशे च्या तुटवड्याची रिॲक्शन !!

प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी अजय गायकवाड
मालेगाव : - अचानक ५०० रूपये किंमतीचे स्टॅम्प पेपर म्हणजे मुद्रांकाचा तुटवडा निर्माण झाला असून त्याऐवजी शंभर रुपये किंमतीच्या स्टॅम्प पेपरचा वापर वाढला आहे. मोठ्या रकमेच्या किंमतीचे मुद्रांकाचा तुटवडा हा कृत्रिमरीत्या असल्याची चर्चा असून नव्या मुद्रांक शुल्कात सुधारणा करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या ॲक्शन वरच्या रिॲक्शन चा हा परीणाम दिसून येत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने ३० सप्टेंबर रोजी निवडक मालमत्ता व्यवहारांसाठी मुद्रांक शुल्क दरांमध्ये सुधारणा जाहीर केली आहे. कामाचे कंत्राट, भूखंडांचे एकत्रीकरण, पुनर्रचना, विभागणी आणि विलीनीकरणासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने असेही म्हटले आहे की, कोणत्याही दस्तऐवजाची नोंदणी १०० मध्ये केली जाणार नाही. अगोदर कागदपत्रांच्या नोंदणीसाठी आकारली जाणारी किमान रक्कम १०० रुपये होती.
आता मुद्रांक शुल्क १०० वरून ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.
१०० रुपयांच्या मुद्रांक पेपरचा वापर
भारतात, १०० रुपयांचा मुद्रांक पेपर सामान्यतः प्रतिज्ञापत्र, करार, बाँड, पॉवर ऑफ ॲटर्नी आणि विक्री करार यासारख्या कायदेशीर कागदपत्रांसाठी वापरला जातो. तथापि, १०० रुपयांच्या मुद्रांक पेपरचे काही उपयोग येथे आहेत:
प्रतिज्ञापत्रे: रु १०० मुद्रांक पेपर सामान्यतः कायदेशीर प्रतिज्ञापत्र करण्यासाठी वापरले जातात. हे तथ्यांचे शपथपत्र आहे जे न्यायालयात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते.
लीज करार: १०० रुपयांच्या मुद्रांक पेपरवर ११ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी भाडे करार किंवा लीज करार केले जाऊ शकतात.
भेटवस्तू: डीड ऑफ गिफ्ट एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याचा वापर जंगम किंवा स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतरित करण्यासाठी केला जातो. भेटवस्तूचे मूल्य १०० रुपयांच्या मुद्रांक पेपरवर नमूद केले जाऊ शकते.
पॉवर ऑफ ॲटर्नी: पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणून ओळखले जाणारे अधिकृत दस्तऐवज एखाद्याला दुसऱ्या व्यक्तीच्या जागी काम करण्याचा अधिकार देते. पॉवर ऑफ ॲटर्नी बनवण्यासाठी १०० रुपयांचा मुद्रांक पेपर वापरता येतो.
विक्री करार: विक्री करार हा जंगम किंवा स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतरित करण्यासाठी कायदेशीर कागदपत्र आहे. ५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीचा विक्री करार करण्यासाठी १०० रुपयांचा मुद्रांक पेपर वापरला जातो. पण यापुढे आता ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरवा लागणार आहे. पूर्वी शंभर रुपये किंमतीचा मुद्रांक अनेक कामांसाठी केला जात असे.
जसे नुकसानभरपाई बाँड: नुकसानभरपाई बाँड हा दोन पक्षांमधील कायदेशीर करार आहे ज्यामध्ये एक पक्ष कोणत्याही नुकसान किंवा नुकसानीच्या बाबतीत दुसऱ्या पक्षाला भरपाई देण्यास सहमत आहे. १०० रुपयांचा मुद्रांक पेपर नुकसानभरपाई बाँड तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
मुद्रांक विक्रेता वर्ग आपल्या कडे जास्त चलन असलेले मुद्रांक संपणार नाहीत याची काळजी घेत असतो. त्याचा परीणाम म्हणून स्टॅम्प पेपर विक्रेत्यांनी आपल्या स्टॉक मधील १०० चे मुद्रांक (स्टॅम्प) संपविण्यासाठी ५०० रूपयांच्या मुद्रांकाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आल्याची चर्चा आहे.
चौकट
राज्य सरकारची नफेखोरी लालसा….
आता राज्य सरकारने त्यात मुद्रांक शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. ते शंभर वरून एकदम ५०० रूपये अशी घसघशीत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने अनेक लोकप्रिय घोषणा अंमलबजावणी चा जो धडाका लावला त्यात लाडकी बहिण सारख्या योजना चा ताण राज्याच्या तिजोरीवर ताण कमी करून सरकारची तिजोरी भरण्यासाठी सरकारने ही एकदम पाचपट वाढ जनतेवर लादली जात आहे असे दिसते. येथे एक बाब विशेष महत्त्वाची आहे. लहान किंमत असलेल्या व जास्तीत जास्त मागणी या मुद्रांक एकदम वाढ केल्याने त्यातून अधिक उत्पन्न वाढविण्यासाठीच सरकार ची नफेखोरी ची लालसा यातून दिसते.



