जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला प्रकाशित केले. ते आज अंधारत!

मुक्ताईनगर मधील दलित वस्ती अंधारात नेमकं काय कारण?


मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर येथील मुख्य प्रवर्तन चौक ते बऱ्हाणपूर रोड ह्या रस्त्यावरील दिवाबत्ती ही बंद असा प्रश्न तिथे रहिवासी व जनतेला झालेला आहे.
मुक्ताईनगर मध्ये गेल्या चार महिन्यापासून ते मुख्य रस्त्यावरील दिवाबत्ती बंद आहे असं नागरिकांनी म्हणणे आहे नोव्हेंबर महिन्यापासून सदर ही दिवाबत्ती बंद करण्यात आलेली आहे नेमकं काय? कारण असे कोणते काम सुरू आहे की दलित वस्तीतील दिवाबत्ती बंद करण्यात आलेली आहे. की काय वैचारिक वादातून आहेत की राजकीय हित संबंधातून आहे. याचा अद्यावत कारण त्या जनतेला कडलेलं नाही. अधिकाऱ्यांना या संदर्भात त्या जनतेच्या सर्वसामान्य लोकांनी विचारले असा अधिकारी त्यावरती योग्य ते उत्तर अजून पर्यंत देऊ शकलेले नाही. ज्या महामानवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे सर्व जग प्रकाशित झाले असे म्हटले जाते परंतु आज मुक्ताईनगर येथील परिस्थिती फार वेगळी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौक ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, ह्या अशा तीन महान व्यक्तींची पुतळे असताना देखील त्या ठिकाणी आज अंधारच चार महिने झाले ही परिस्थिती कायम दिसून येत आहे कुठलाही काम बाकी नसताना ही का दिवाबत्ती बंद आहे .
प्रवर्तन चौक ते बऱ्हाणपूर रोडवरील वाशिम सेंटर पर्यंत ही दलित वस्तीत असलेल्या नागरिकांच्या घरासमोरील दिवाबत्ती आहे . मुक्ताईनगर मधील इतर भागातील सर्व दिवाबत्ती सुरू आहे. भर दिवसा सुद्धा सुरू असतात परंतु मुक्ताईनगर येथील दलित वस्तीत असलेल्या ही दिवाबत्ती का बंद करण्यात आलेली आहे असा प्रशासनाला प्रश्न नागरिकांचा. मुख्याधिकारी नेमकं काय करत आहे. मुख्याधिकाऱ्यांना ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यांना कसे मुंबई चे मुख्याधिकारी झाल्याचे वाटत आहे. नागरिकांनी त्यांना विचारणा केली असता मुख्याधिकारी हे नेहमी प्रमाणे मी मुंबईला मीटिंगसाठी आहे. कामानिमित्त आलेलो आहे. असे उत्तर दिले जात आहेत परंतु मुक्ताईनगर येथील रहिवाशी जे घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी, त्यामध्ये दिवाबत्ती कर सुद्धा वसूल केला जात असतो त्या लोकांना ह्या सुख सुविधा देण्याचे आद्य कर्तव्य नगरपंचायत महानगरपालिका ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून केले जात असते. आज रोजी ते कुठेतरी पायमल्ली झाल्याचे दिसत आहे. दलित वस्तीच्याच नागरिकांना त्रास दिला जात आहे असे या ठिकाणी संबोधले जात आहे.असं नागरिकांचे मुख्याधिकारी यांच्यावरती आरोप केला गेलेला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button