महाराष्ट्र

बदलापूर येथील दुर्दैवी घटनेच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या- आ.ॲड आकाश फुंडकर

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

भाजपा तर्फे या गंभीरघटनेच्या निषेधार्थ मुक आंदोलनखामगांव भारतीय जनतापार्टीच्या वतीने आज दि.24/08/2024 रोजी स.10.30 वा महात्मा गांधी उद्यान येथे महात्मागांधीच्या पुतळयासमोर बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षादेण्यात यावी यासाठी मुक आंदोलन करण्यात आले.      बदलापूर येथील दुर्दैवी घटना घडली या घटनेतीलआरोपींना फाशिची शिक्षा देण्यात यावी अशी जनसामान्यांची भावना आहे.  परंतु राज्यात काही दिवसापुर्वी उरळ येथे शिंदेनावाच्या युवती वर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून अत्यंत निर्मम हत्या केल्याची घटनाघडली होती.  त्या घटनेच्या वेळी गप्प़ बसलेलेविरोधक बदलापूर घटनेच्या बाबतीत राजकारण करतांना दिसतात. या घटनेचा निषेध यावेळी करण्यातआला. यावेळी भाजपाचे संजय शिनगारे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राम मिश्रा,  चंद्रशेखर पुरोहित, जितेंद्र पुरोहित, पवन गरड, राजेंद्रधनोकार,  जान्हवी कुळकर्णी, शेखर कुळकर्णी,शिवानी कुळकर्णी, भक्ती वाणी, नरेंद्र शिंगोटे, भाग्यश्री मानकर,गोलु आळशी, विजु उगले,अभिजितएदलाबादकर, रोहन जैसवाल, यांचे सह भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारीव कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थि‍त होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button