खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
बँक स्ट्राईक मुळे तब्बल सलग तीन दिवस बँक बंद राहणार. कस्टरमर साठी मात्र यावेळी वेगळी संधी…….

साप्ताहिक आवाज न्यायचा
प्रफुल्ल पहुरकर
नवी मुंबई
दि . 25/09/2026
युनायटेड फोरम ऑफ युनियन तर्फे तीन दिवस स्ट्राईक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे 28ते 30 तारखेपर्यंत बँक कामकाज पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परंतु यावेळेस पहिल्यांदाच कस्टमर साठी बँक रविवारी सुद्धा सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना उद्या शनिवारी बँक बंद असल्यामुळे सेवा घेता येणार नाही. मात्र बँक रविवारी सुरू राहणार असून ग्राहकांनी आपले बँक मधील कामे रविवारी पूर्ण करावी. अन्यथा त्यांना अजून तीन दिवस वाट पाहावी लागेल. पाच दिवसाचा आठवडा करावा अशी मागणी बँकर्स तर्फे करण्यात आली आहे. तीन दिवसीय स्ट्राइक नंतर काय निकाल येतो. याकडे सर्व बँकर्स कर्मचारी यांचे लक्ष लागलेले आहे.



