खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रविदर्भ

जे. ई. स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात

प्रश्नमंजुषा स्पर्धेत सह्याद्री गट विजेता; हिमालय गट उपविजेता

मुक्ताईनगर : जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे 28 सप्टेंबर 2026आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याच्या शासकीय प्रपत्रकानुसार माहितीचा अधिकार अधिनियम-2005 या विषयावर आधारित विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच पारदर्शकता व उत्तरदायित्वाचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी होते, तर उपप्राचार्या व्ही. के. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य चौधरी यांनी माहितीचा अधिकार हा नागरिकांसाठी महत्त्वाचा अधिकार असून, विद्यार्थीदशेतच या कायद्याची माहिती आत्मसात केल्यास भविष्यात जागरूक नागरिक घडण्यास मदत होईल, असे सांगितले.

इयत्ता 9वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांचे विंध्या, हिमालय, सह्याद्री आणि सातपुडा असे चार गट तयार करण्यात आले होते. माहितीचा अधिकार कायदा, अर्ज करण्याची पद्धत, अपील प्रक्रिया व कायद्याची वैशिष्ट्ये यांसह विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व अभ्यासपूर्ण उत्तरे देत स्पर्धेत रंगत आणली.

अटीतटीच्या अंतिम फेरीत सह्याद्री गटाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले, तर हिमालय गटाने द्वितीय क्रमांक मिळवत उपविजेतेपद पटकावले. विजेत्या संघाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

स्पर्धेचे आयोजन उपशिक्षिका आर. डी. भोळे व टी. एस. ढाके यांनी केले. परीक्षक म्हणून वाय. एस. पाटील व एस. एस. सावकारे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. डी. भोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button