शासन आपल्या दारी”पण महायुतीच्या घटक पक्षात “नाराजी” रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवईंना संताप; म्हणाले, त्यांनी आम्हाला कमजोर समजू नये, परिणाम भोगावे लागतील„

शासन आपल्या दारी”पण महायुतीच्या घटक पक्षात “नाराजी” रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवईंना संताप; म्हणाले, त्यांनी आम्हाला कमजोर समजू नये, परिणाम भोगावे लागतील„
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी उषा इंगळे बुलढाणा
शासन आपल्या दारी कार्यक्रम काल, ३ सप्टेंबरला बुलढाणा संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप शिवसेनेचे लोकप्रतिनिधी या
कार्यक्रमाला उपस्थित होते. सत्ताधारी गटात असूनही आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवीत सकल मराठा समाजाच्या वतीने देऊळगाव राज्यात आयोजित मोर्चाला उपस्थित राहण्यात प्राथमिकता दिली. कुठे गेली कार्यक्रमाची जाहिरात करताना फोटोंचा प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. माजी मंत्री आणि जिल्ह्यातील सर्वात वरिष्ठ आमदार असताना डॉ . शिंगणे यांचा फोटो मात्र शेवटच्या क्रमांकावर होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावरून नाराज होतेच.. आज पुन्हा सत्ताधारी महायुतीचा घटक असलेल्या रिपाईला डावलण्याचं काम स्थानिक आयोजकांनी जाणीव पूर्वक केलं. त्यांनी आम्हाला कमजोर समजू नये.
आमच्यासोबत तुझा भाव करून महायुतीला जड गेल्याशिवाय राहणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई यांनी दिली.



