बुलढाणामहाराष्ट्र

शाळेतून घरी येतानाअल्पवयीन विद्याथीनीचा विनयभंग

शाळेतून घरी येतानाअल्पवयीन विद्याथीनीचा विनयभंग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव | शिकवणीवर्गातून घरी जात असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा दोघांनी पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना आळसणा येथील घडली. याप्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळसणा येथील सदर विद्यार्थीनी शेगाव येथील एका शाळेत शिकते. व दररोज बसने ये-जा करते. मागील काही दिवसांपासून गावतीलच मंगेश भारत काकडे व ऋतिक उर्फ लड्ड्या राजू तायडे हे सदर विद्यार्थीनीचा पाठलाग करित होते. दरम्यान मंगळवार १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थीनी शिकवणी वर्गातून घरी जाण्यासाठी रस्त्याने पायी निघाली असता या दोघांनी तिचा पाठलाग करून विनयभंग केला. या घटनेची तक्रारी पीडितेने शेगाव ग्रामीण पो.स्टे.ला दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघा आरोपींविरूध्द कलम ३५४ (ड), ३५२, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button