तांदूळवाडी वणी वारुळा रस्त्यावरील फुल गहाळ रिपाई आठवले गटाची चौकशीसाठी तक्रार. प्रतिनिधी राजेंद्र मुंडे

अकोट तालुक्यातील तांदूळवाडी वणी वारुळा रस्त्यावरील डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यावरील फुल व रपटे संबंधित अधिकारी व ठेकेदाराने गहाळ केले आहेत याबाबत रिपाई आठवले गटाच्या वतीने निवेदने देण्यात आली परंतु अद्याप पर्यंत कोणतीही चौकशी संबंधितांकडून करण्यात आलेली नाही. सदर चौकशी १ जानेवारी २०२४ च्या आत न केल्यास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा पार्टीच्या जिल्हा महासचिव सरिता देवी मनोहर, राजकुमार वानखडे, अजय प्रभे, पंकज सुलताने, सागर वडतकर, राजेश तेलगोटे, कमल किशोर भरतीया, लिलाबाई शेजव, अंतकला जुमळे, लताताई धनकड सह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे सदर चौकशी १ जानेवारी २४ च्या आत न झाल्यास १ जानेवारीपासून आमरण उपोषण छेळण्यात येईल. सदर निवेदनाच्या प्रति माननीय रामदासजी आठवले, मा. मुख्यमंत्री मुंबई, मा जिल्हाधिकारी अकोला, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला, मा. ठानेदार खदान पोलीस स्टेशन अकोला यांना देण्यात आले आहेत.



