प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तेल्हारा च्या वतीने तणावमुक्त जीवन व्यतीत करण्यासाठी महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन शिबिराचा आरंभ!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
दि.१२ :-प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तेल्हारा च्या वतीने दि.१० ते १८ डिसेंबर नऊ दिवशीय तणाव मुक्त जीवन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.१० डिसेंबर च्या सायंकाळी राजयोग अनुभूती शिबिराचे मोठया उत्साहात उदघाटन संपन्न होऊन शिबिराचा आरंभ झाला. उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदी प्रमुख अकोला वाशीम ब्रह्माकूमारीज सेवा केंद्र, मुख्य मार्गदर्शिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी विद्या दीदी इंदोर, प्रमुख उपस्थिती संगीता अढाऊ अध्यक्षा जी.प अकोला, अनंतराव अहेरकर संचालक सेवा सहकारी संस्था,रामाभाऊ फाटकर अध्यक्ष तेल्हारा विकास मंच, सुरेश सिंगणारे गुरुजी , ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी तेल्हारा, ब्रह्माकुमारी सुषमा दीदी खामगांव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे ब्रह्माकुमारी वैशाली दीदी लाईट हाऊस अकोला यांनी स्वागत केले तर सर्व उपस्थितांचे कु सुहानी चांडक हिने नृत्य करून स्वागत केले. दररोज सकाळी ०७:३० ते ०९:००पर्यंत म्हणजे दिड तास आणि सायंकाळी ०६:०० ते ०७:३० या वेळेत तणावमुक्त जीवन व्यतीत करण्यासाठी महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन होणार आहे. आपल्या परिवारातील तणावाचे कारण आपण स्वतः असाल किंवा परिवारात काही तणावग्रस्त चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असेल तर आपल्यासाठी हे शिबीर अतिशय उपयुक्त ठरणार आहे.निशुःल्क असणाऱ्या शिबिरामध्ये सकाळी किंवा संध्यकाळी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण सहपरिवार उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रुख्मिणी दीदींनी तेल्हारा वासियांना केले आहे.
उदघाट्न समारंभा नंतर पहिल्या दिवशी चिंतारहीत जीवनशैली या विषयावर मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी विद्या दीदींनी सध्याच्या तणाव ग्रस्त जीवनशैली कडून तणावमुक्त जीवनशैली ला दैनंदिन जीवनात आत्मसात करण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान आणि सकारात्मक विचाराची धारणा करावी. आपण अल्प काळासाठी अनेक यात्रांना जातो तेव्हा विशेष तयारी करावी लागते तसेच जीवन ही दीर्घकाळ चालणारी यात्रा असून अंतिम ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी प्रवास सुखकर होण्यासाठी कोणती तयारी असावी यांचे सुंदर विवेचन मार्गदर्शनातून दीदींनी केले. दि. १८ डिसेंबर पर्यंत नियमित मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे तेल्हारा सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी यांनी आवाहन केले आहे. कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमार श्याम भाई,ब्रह्माकुमारी वैशाली दीदी, ब्रह्माकुमारी स्नेहल दीदी,अरुण अकोटकर,बापूराव खारोडे, गोपाल भुजबळे, सतीश धरमकार, पप्पू सोनटक्के, सत्यनारायण चांडक, गोपाल बाजोड इत्यादी सह तेल्हारा सेवा केंद्राच्या ज्ञानार्थी भाऊ बहिणींनी सहकार्य केले. उदघाट्न समारंभाचे उत्कृष्ट संचलन ब्रह्माकुमारी सुषमा दीदी खामगांव यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला असंख्य भाविकं उपस्थित होते



