*पो.स्टे.समोरील स्वाभिमानीच्या उपोषणाची लेखी आश्वासनाने सांगता.*संग्रामपूर/तालुक्यातील अवैध धंदे बंद करा

या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तामगाव पोलिस स्टेशन समोर सुरु केलेल्या उपोषणाची तामगाव पो.स्टे. चे.पी आय प्रमोद उलेमाले व सोनाळा पो.स्टे.चे पी.आय.भास्कर यांच्या लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता करण्यात आली. गावा गावात सर्रासपणे चालु असलेली अवैध दारु विक्री,मटका व जुगार बंद करण्यात यावा जेणेकरून गावातील महिला सुरक्षीत राहतील शाळेतील विद्यार्थ्यांनवर होणारे वाईट परिणाम टळतील व रात्री बे रात्री होणाऱ्या वाईट घटनेला आळा बसेल याकरीता पोलिस प्रशासनाने अवैध धंदे बंद करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. अशी मागणी उपोषण कर्त्यांकडुन करण्यात आली. संध्याकाळी ७ वाजता तामगाव व सोनाळा पो.स्टे. ठाणेदार यांनी उपोषण मंडपात जाऊन प्रशांत डिक्कर व त्यांच्या सहकाऱ्यांशी तालुक्यात चालु असलेल्या अवैध धंद्याबाबत दोन तास चर्चा केली. यावेळी श्री संत सोनाजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या सोनाळा गावातील पिंगळी चौक, बसस्टँड, असे जागो जागी मटक्याचे दुकानं सजवले आहेत. हे दिवसा ढवळ्या राजरोज सर्रासपणे मटका चालवतात. आदर्शगाव पुरस्काराने गौरविण्यात आलेले वकाणा गाव या सारखे अनेक गावांतील अवैध धंद्याबाबत उपोषण कर्त्यांनी प्रश्नांची सरबती केली. पंरतु अनेक गावांतील अवैध धंद्यात सत्ताधारी नेत्यांची हिस्सेदारी आहे त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत नाही. असा आरोप प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बोलतांना केला. आपलेच पोलिस वेळेचं कारण पुढे करुन निर्दयीपणाने चालु किर्तन बंद करतात. आणि शेतकरी शेतमजुर आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतात त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्या जातात. तर मग सोनाळ्यातील वर्ली मटका चालवणाऱ्यावर का गुन्हे दाखल होत नाहीत असा सवाल यावेळी प्रशांत डिक्कर यांनी उपोषण मंडपात उपस्थित केला. या पुर्णवेळ झालेल्या चर्चेअंती तालुक्यात अवैध धंदे विरोधात कडक कारवाई करण्याचे बीट अंमलदार यांना लेखी सुचना देण्यात आल्या आहेत. यापुढे अवैध धंदे करणाऱ्याची गय केल्या जाणार नाही. असे उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी उपोषणमधे स्वाभिमानीचे रोशन देशमुख, विलास तराळे, विजय ठाकरे, योगेश मुरुख, कलिमोद्वीन काजी, शिवा पवार, गणेश वानखडे, अमोल आगरकर, सुपडा सोनोने, हरीदास अमझरे, सागर मोरखडे, श्रीकृष्ण बोरोकार, राहुल सन्निसे, बाळू जाधव, गणेश इंगळे, संतोष बोपले, पुंडलिक राऊत, मारोती खिरोडकार, देविदास बोबळे, दुर्गा म्हसाड, करूणा गव्हांदे, अंबिका इंगळे, वंदना भोपळे, कमलाबाई राऊत, संगिता जाधव, लता गव्हांदे, जयश्री गव्हांदे, निता खिरोडकार, द्वारकाबाई गव्हांदे, यांच्या सह बहुसंख्य नागरिक व महिलांची उपस्थिती आहे.



