पीएम किसान योजना : शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी, नाहीतर चौदाव्या हप्त्यांपासून राहाल वंचित

*पीएम किसान योजना : शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी, नाहीतर चौदाव्या हप्त्यांपासून राहाल वंचित* (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) *शेगांव* : पीएम किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान सन्मान निधी योजनेच्या पुढील चौदाव्या हप्त्यांच्या वितरण नियोजनासाठी राज्यात व गाव पातळीवर सर्वत्र मोहीम राबवून या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहू नये.यासाठी शेगांव तालुक्यातील राहिलेल्या ४७१९ लाभार्थ्यांनी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न पूर्ण करावे.यासाठी सर्व प्रलंबित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकांच्या मदतीने ई-केवायसी प्रमाणीकरण व आधार संलग्न काम करून घ्यावे,केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नरमध्ये ओटीपी आधारे तसेच सामाईक सुविधा केंद्राद्वारे लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पीएम किसान ऍप अँड्रॉइड मोबाईलवर फेस ऑथेंटीकेशनद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाही केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना स्वतःचे ई-केवायसी करता येणार आहे. कमी वेळ असल्याने शनिवारी व रविवारी यादिवशी काम सुरू ठेवण्यात येणार आहे. ऍपच्या माध्यमातून तत्काळ प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. ज्या पात्र लाभार्थीचे नावे आधार प्रामाणिकरण त्रुटी मध्ये आले आहे त्यांनी जवळच्या सीएससी सेंटर,ग्राहक सेवा केंद्र किंवा पोस्ट आफिस येथे जाऊन शेतकऱ्यांनी खाते उघडून घ्यावे असे निर्देश शेगांव कृषी विभागाने केले आहे.



