एक रुपयांमध्ये विमा मिळणार

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगाव -वीमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचे भरपूर आर्थिक नुकसान होते.निसर्गाचे अवचित साधून नासाडी झाल्याने पिक विमा आपल्या खात्यामध्ये जमा होईल की नाही हे मात्र शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्हच आहे. शेतकऱ्याची आर्थिक तुटवणूक होऊ नये त्या संदर्भात राज्य शासनाच्या नव्या नियमानुसार ऑनलाइन पद्धतीने एका रुपयामध्ये विमा कसा मिळणार हे सूचक राज्य सरकार बाबत सर्व राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. पिकाच्या नासाडीमुळे शेतकरी हतबल होऊन जातो. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती फारशी राहत नाही.यात संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने फक्त एक रुपयांमध्ये विमा काढता यावा. त्यासाठी नवीन योजना संकल्पना सुरू केली आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे व नोंदणी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना फक्त एक रुपये खर्च येणार आहे. पिक विमा भरण्यासाठी जो खर्च आहे जो खर्च सर्व महाराष्ट्र शासन करणार आहे. त्याच्यामुळे आता महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मार्फत माहिती देण्यात आलेली आहे.तर केंद्र सरकारच्या 2016सालीच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी विमा हप्त्याची दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरण्याची तरतुदीते काढण्यात आली होती. परंतू आता हा भार सुद्धा शेतकऱ्यांवरती न ठेवता, पीक विमा भरण्याची ती रक्कम सुद्धा आता महाराष्ट्र सरकार भरणार आहे.असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. म्हणजेच पूर्वी 2016 रोजी जे काही प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली होती.यामध्ये जो काय हप्ता असणार होता त्या हप्त्याच्या दोन टक्के विमा शेतकऱ्यांना फक्त ते भरावा लागत होता.तर आता तेवढी पण रक्कम आता शेतकऱ्यांना भरावी लागणार नाही. संपूर्ण रक्कम आता महाराष्ट्र सरकार भरणार आहे. जवळपास 3312 कोटी रुपयांची तरतू दिले राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पनेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी हा महत्वाचा निर्णय आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपया मध्ये पिक विमा दिला जाणार आहे. एक रुपयांमध्ये पिक विमा मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागेल. जर नोंदणी केली नाही तर शेतकऱ्यांना पिक विमा हा मिळणार नाही.त्यासाठी जी काही नोंदणी आहे ती नुकतीच सुरू करण्यात आलेली नोंदणी करण्यासाठी अगदी दोन पर्याय दिलेले आहे.ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने पीएम किसान चा ऑप्शन पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे. आणि ऑफलाइन पद्धतीने जवळच्या सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन पिक विमा योजनेची नोंदणी करायचीआहे तर यामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच या योजनेअंतर्गत खूप मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे एक रुपयांमध्ये पिक विमा देण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच मोठी मदत मनून ठरेल.



