आंतरराष्ट्रीयखानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

माननीय कांशीरामजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त येत्या १५ मार्च २०२६ ला वर्धा येथे विदर्भ दोन स्तरीय भव्य मेळाव्याचे आयोजन!!!

  स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, 


प्रतिनिधी संग्रामपूर, 

रतन भगत.

   दिनांक ९/३/२०२६:- सविस्तर वृत्त असे की, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक माननीय कांशीरामजी साहेब यांची येत्या १५ मार्च २०२६ ला जयंतीच्या निमित्ताने विदर्भातील वर्धा येथे विदर्भ झोन स्तरीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. माननीय कांशीरामजी साहेब यांनी या भारतामध्ये बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आहे. आणि येत्या १५ मार्चला माननीय कांशीरामजी साहेब यांच्या जयंतीच्या औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी यांचे उमेदवार जास्तीत जास्त कशा पद्धतीने निवडून येणार आहेत यासाठी बहुजन समाज पार्टी मधील बऱ्याच मोठ्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती वर्धा येथे राहणार आहे. त्यामध्ये विशेष उपस्थिती म्हणून माननीय डॉक्टर मोहन राईकवार महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा विदर्भ झोन इन्चार्ज बसपा, माननीय मुकुंद दादा सोनवणे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बसपा तथा विदर्भ झोन इन्चार्ज, या सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय एडवोकेट सुनील डोंगरे साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बसपा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत . या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामजी गौतम साहेब राज्यसभा खासदार तथा महाराष्ट्र केंद्रीय प्रभारी  , माननीय मंगेश ठाकरे महाराष्ट्र प्रदेश महासचिव बसपा माननीय नागोराव जयकर महाराष्ट्र प्रदेश महासचिव बसपा माननीय कृती शेंडे महाराष्ट्र प्रदेश महासचिव बसपा माननीय महेंद्र मकेश्वर प्रदेश सचिव बसपा माननीय दादाराव उईके प्रदेश सचिव बसपा माननीय नफिज भाई मुस्लिम भाईचारा कमिटी अध्यक्ष विदर्भसं प्रभारी बसपा माननीय विवेक आहे की माननीय पूर्व विदर्भ झोन प्रभारी बसपा माननीय प्रफुल्ल मानके महा पूर्व विदर्भसून प्रभारी बसपा माननीय योगेश लांजेवार जिल्हाध्यक्ष नागपूर बसपा माननीय विजय बचके जिल्हाध्यक्ष संभाजीनगर बसपा माननीय एडवोकेट राहुल गवळी जिल्हाध्यक्ष वाशिम बसपा माननीय भास्कर मेश्राम जिल्हाध्यक्ष गडचिरोली बसपा माननीय सुनील भरणे जिल्हाध्यक्ष गोंदिया बसपा तथा नगरसेवक माननीय अनिल विटेकर जिल्हाध्यक्ष जालना बसपा माननीय रत्नाकर साठे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर बसपा माननीय सरकटे सर जिल्हा अध्यक्ष बुलढाणा बसपा माननीय धर्मपाल इंगळे माजी झोन प्रभारी माननीय एडवोकेट विद्यासागर वानखडे माननीय डॉक्टर एन एस तुरकर अध्यक्ष भोयर पवार भाईचारा कमिटी महाराष्ट्र प्रदेश माननीय मोहसीन खान मुस्लिम भाई जरा कमिटी विदर्भ घेऊन माननीय डॉक्टर विद्याताई रायकवार महिला संघटिका बसपा महाराष्ट्र प्रदेश माननीय स्कर्मिस खडसे ज्येष्ठ पत्रकार ओबीसी नेते बसपा माननीय देवानंद गवळी माजी सोन प्रभारी. या कार्यक्रमाला वरील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे निमंत्रक माननीय अनोमदर्शी भाईसारे जिल्हाध्यक्ष बसपा वर्धा हे आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवा प्रबोधनकार माननीय विकास राजा आणि त्यांचा संच काटोल यांचा प्रबोधनात्मक दणदणीत असा कार्यक्रम राहणार आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला बहुजन समाज पार्टीच्या वतीने आमंत्रण देण्यात येत आहे. अशी माहिती बुलढाणा जिल्हाध्यक्ष आयुष्यमान दिलीप सरकटे सर यांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button