Uncategorized

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनब्दा ता. तेल्हारा येथे मियावाकी स्वस्तिक पॅटर्न पद्धतीने वृक्ष लागवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

मनब्दा ; तेल्हारा तालुक्यातील मनब्दा ग्राम येथे बुधवार दि. ५ जुन २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग अकोला अधिनस्त परिक्षेत्र कार्यालय तेल्हारा अंतर्गत ग्राम मनब्दा येथील जिल्हा परिषद शाळा मध्ये वृक्ष क्रांती मिशन चळवळीचे श्री एस नाथन साहेब यांच्या अगुवाईत मीयावाकी पद्धतीनुसार स्वस्तिक पॅटर्नमध्ये वृक्ष लागवडीचा उद्घाटन सोहळा अकोला जिल्हा परिषद मा. CEO श्रीमती बि वैष्णवी मैडम (भा.प्र.से), यांचे हस्ते, मा. DFO सामाजिक वनीकरण विभाग अकोला श्री महेश खोरे सर, यांचे प्रमुख उपस्थितीत, मा. ZP Dy. CEO श्री परीहार सर यांचे मार्गदर्शनात पार पडला. वृक्ष क्रांती मिशन चे मा. श्री एस नाथन साहेब यांच्या अथक प्रयत्नामुळे व सेवाभावी वृत्तीमुळे हे शक्य झाले. यावेळी माननीय महोदयांचे समायोजित भाषणे झालीत. आणि विशेष महोदयांच्या हस्ते हे विशेष स्वरुपाचे वृक्षारोपण करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री चिकटे सर व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी गण, शाळा समिती अध्यक्ष व सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतोनात प्रयत्न केले. या श्रमजीवी कामासाठी गावकऱ्यांचे व वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी, वनप्रेमी यांचे बहुमूल्य योगदान लाभले.
मनब्दा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ पाथ्रीकर मॅडम यांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. कार्यक्रमासाठी तेल्हारा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री मुंडे साहेब, तेल्हारा परीक्षेत्र अधिकारी सौ जैस्वाल मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड स्वस्तिक पॅटर्नमध्ये करण्याची संकल्पना वृक्ष क्रांती मिशनचे श्री एस नाथन साहेब यांची असून त्यांनी मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अकोला श्री महेश खोरे सर यांचे सोबत चर्चा करताच DFO सरांनी तत्काळ विभागाला निर्देश देऊन तालुक्यात कार्य योजनार्थ नोडल ऑफिसर म्हणून तेल्हारा परिक्षेत्र अधिकारी यांना सर्व अधिकार प्रदान करून त्यांनी आवश्यक तेवढी रोपे पुरवून मोलाचे सहकार्य केले. जिल्हा परिषद शाळा मनब्दा मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, समस्थ विद्यार्थी/विद्यार्थिनी वर्ग, विशेष करून महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कष्टकरी महिला वर्ग, आणि समस्त गावकरी मंडळी, गावप्रमुख, पत्रकार बंधू, यांच्या सहकार्याने हे आवाहन यशस्वीरित्या पेलणे शक्य झाले. शाळेचे मुख्याध्यापक श्री चिकटे सर यांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडली, श्री पाठक सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, आणि आभार प्रदर्शन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरण तेल्हारा यांनी केले. कार्यक्रम समाप्तीनंतर सरपंच महोदयांकडून जलपानाचे सोपस्कर पार पडले. तसेच रोजंदारी मजूर श्री शेंडे, श्री भिका तायडे, श्री भारत वाकोडे, श्री लक्ष्मण सोलकर, श्री राजेंद्र तायडे, श्री केशवराव देशमुख, श्री विनोद भाकरे, श्री मोकळकार, श्री खंडारे, श्री शैलेश भड या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कष्ट घेतले. कार्यक्रमात बहुसंख्य गावकरी व वन्यप्रेमी, महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ चे पदाधिकारी, तसेच पत्रकार मंडळी आवर्जून उपस्थित होते. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तेल्हारा तालुक्यातील नवयुग विद्यालय वाडी , एस बी हायस्कूल तेल्हारा, शहरातील बस स्थानक आदि ठिकाणीही वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन याविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची आखणी व रूपरेषा मांडणी करिता तेल्हारा सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे परिमंडळ अधिकारी श्री गिरणारे साहेब व नियत क्षेत्र अधिकारी श्री भास्कर शिरभाते साहेब तसेच श्री संजयकुमारजी सुईवाल या सर्वांनी मोलाची भूमिका पार पाडली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button