रस्त्याच्या चौकशीसाठी उपोषण lदि.२८ला मालेगाव बंद चा इशारा !

शिस्तभंग व फौजदारी कारवाई करण्यात कार्यकारी अभियंता यांची टाळाटाळ
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – उपोषणकर्त्याचा तिसरा दिवस होऊन ही अधिकाऱ्याचे दुर्लक्ष केले जात आहे मालेगाव येथील दिनांक 24 एप्रिल रोजी तहसील कार्यालय समोर सामाजिक कार्यकर्त्याचे आमरण उपोषण केले आहे
नगरपंचायत मालेगाव येथे करण्यात आलेले वैशिषटयपूर्ण योजनेचे काम निकृष्ट,बोगस केल्याने याला जवाबदार अभियंते पुनम राठोड,डी.सी.खारोले, के.एस.जोगदंड,आणि श्रीमती.पि.एस.धायगुडे,यांचे विरुध्द फौजदारी व शिस्तभंग कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप उपोषण करते सामाजिक कार्यकर्ता सुनिल शर्मा,प्रदीप सावले,प्रकाश यादव,यांनी केला आहे.
माहीतीचा अधिकार द्वारे वैशिषटयपूर्ण / नावीन्य पूर्ण योजनेच्या कामे केली त्या, कामाचे मालेगांव सन 2021-22 मधील कामे दस्ट प्राप्त झाले आहेत महितच्या अधिकारात प्राप्तदस्त हे कोर्ट कचेरी मधुर पुरावें म्हणुन सादर होऊ शकतात परंतू मालेगांव येथील रस्याचे कामचे दस्त असतांनाही कारवाई करण्याचे टाळले जात आहे
याची आता मालेगाव येथील नागरिकांनी दखल घेतली असून दिनांक 28 एप्रिल रोजी बाजार पेठ बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्या बाबत तहसीलदार मालेगाव व पोलीस स्टेशन मालेगांव यांना निवेदन दिले असून याद्वारे मालेगांववासी दुकानदार,व्यापारी यांनी आपली दुकाने दी 28 रोजी बंद ठेऊन सहकार्य करण्याची विनंती केली जात आहे.



