महाराष्ट्रमुबई

लाडक्या बहिणीं’ना जाहीर दम देणं धनंजय महाडिकांना भोवणार?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे प्रतिनिधी

काँग्रेसची रॅली निघाली. त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या. ज्या आपल्या योजनेचे 1500 रूपये घेतात. त्यांचे फोटो काढून घ्या. फोटो काढा त्यांची नावं लिहून घ्या. बरोबर आहे की नाही…. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि जायचं त्यांच्या रॅलीत असं नाही चालणार. काही लोक छाती बडवत होते. आम्हाला नको पैसै… आम्हाला नको पैसै आम्हाला सुरक्षा पाहिजे, असं म्हणत होते. पैसे नकोत? राजकारण करता या पैशाचं? काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडं द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कुणी मोठ्यानं भाषण करायला लागली. दारात आली तर लगेच फॉर्म द्यायचा. म्हणायचं बाई तुला नको आहेत ना पैसै? मग यावर सही कर म्हणायचं. धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, धनंजय महाडिक यांच्यावर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात येत असताना त्यांनी राज्यातील महिलांची बिनशर्त माफी मागितली . असे असताना निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button