निवडणूकमहाराष्ट्रराजकीय

भाजपची पहिली यादी जाहीर

जिल्ह्यातील पाच उमेदवार घोषित

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

रवी भालेराव

प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत यात जिल्ह्यातील पाच जागांचा समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, जामनेर, चाळीसगाव, रावेर, भुसावळ अशा पाच मतदारसंघांचा समावेश आहे.
भाजपच्या यादीत आज जामनेरातून ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, जळगाव शहरातून विद्यमान आमदार राजूमामा भोळे, भुसावळमधून आमदार संजय सावकारे, चाळीसगावातुन आमदार मंगेश चव्हाण, रावेर-यावलमधून पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे या नावांचा समावेश आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button