बुलढाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. संजय गायकवाड यांनी घेतली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे भेट,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :- प्रशांत चव्हाण
बुलढाणा -: बुलढाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी साहेब यांची नागपूर येथे भेट घेऊन विविध महत्त्वकांक्षी विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण विकास कामाबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी बुलढाणा -मलकापूर -चिखली महामार्गाची उभारणी, ज्ञानगंगा अभयारण्यातील बोथा फॉरेस्ट परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी फ्लाय ओव्हर, बुलढाणा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड व प्रस्तावित बायपास, बुलढाणा शहरासाठी मिनी विमानतळ ,बुलढाणा -बुऱ्हानपूर -मलकापूर नवीन रेल्वे मार्ग तसेच राजुर घाटाचे दुहेरीकरण या महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी व आवश्यक निधी मिळावा.अशी आग्रही मागणी केली,
यासोबतच मतदार संघातील रस्ते ,वाहतूक, दळणवळण आणि पायाभूत सुविधांची संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात ,अशी विनंती केली.
माननीय श्री नितीन गडकरी यांनी सर्व मागण्या लक्षपूर्वक एकूण संबंधित विभागामार्फत सकारात्मक विचार करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन दिले.
याप्रसंगी नगरपालिका पाणीपुरवठा सभापती श्री नयन प्रकाश शर्मा ,नगरसेवक श्री बबलू मावतवाल, नगरसेवक श्री युनेस्क कुरेशी ,कार्यकारी अभियंता श्री काळे, तसेच स्वीय सहाय्यक रोहित गवळी उपस्थित होते.
बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणारे हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावेत, यासाठी माझा पाठपुरावा पुढेही सातत्याने सुरू राहील असे ते म्हणाले .



