बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पोहायला गेले परंतु घरी परतलेच नाही, पूर्णा नदी पात्रात बुडून 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :-प्रशांत चव्हाण

बुलढाणा:- (दि.12 जुलै ) शाळेला सुट्टी होती म्हणून मित्रांसोबत नदीवर पोहायला गेले ,पण दुर्दैवाने परत आलेच नाही, बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव जवळ असलेल्या पूर्णा नदी पात्रात दोन अल्पवयी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत जीव गमावलेल्या मुलांची नावे .प्रतीक वानखेडे (वय 12) आणि कृष्णा भोपळे ( वय 14) असे आहे हे दोघेही नांदुरा येथील रहिवासी होते, आज शाळेला सुट्टी असल्याने हे दोन्ही मित्र तिसऱ्या मित्रासोबत पूर्णा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले होते ,
त्यामुळे अंघोळीसाठी नदीत उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा आणि खोलीचा अंदाज आला नाही ,बघता – बघता दोन्ही मुले पाण्यात बुडाले यावेळी काठावर असलेला मित्र मात्र सुदैवाने वाचला आजूबाजूला कोणी नसल्याने मुलांचा जीव वाचवता आला नाही दुर्दैव म्हणजे दोन तासानंतर तिथून दोन शेतकरी जात असताना त्यांना ही घटना समजली .त्यानंतर ग्रामस्थांनी नागरिकांच्या मदतीने मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले , घटनेची माहिती मिळतात जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी गाव घेत पंचनामा केला. या एका घटनेमुळे दोन निष्पाप मुलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button