Uncategorized

मालेगाव येथे क्षुल्लक कारणावरुन एकाला लोखंडी रॉड डोक्यात मारून केले गंभीर जखमी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : मालेगाव येथे शुल्लक कारणावरून वाद होऊन त्यामध्ये रोहित कैलास पवार याला एकाने  लोखंडी रॉडने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजता चे सुमारास येथील नवीन मालेगाव परिसरात कृष्णा डेअरी जवळ घडली .  फिर्यादी आकाश कैलास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा भाऊ रोहित कैलास पवार वय 24 वर्ष व्यवसाय मजुरी हा पुणे येथे राहतो .तो काही कामानिमित्त मालेगाव येथे चार-पाच दिवसांपूर्वी आला होता . दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान मी घरी जेवण करत असताना माझा मित्र आदित्य जाधव हा घरी पळत आला व मला म्हणाला की कृष्णा डेरी जवळ तुझा भाऊ रोहित पवार आणि शुभम चव्हाण यांचे भांडण झाले आहे . त्याला शुभम चव्हाण याने लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली आहे व तो जखमी झाला आहे . त्यामुळे मी लगेच त्या ठिकाणी पोहचलो असता माझा भाऊ रोहित याच्या डोक्यातून रक्त निघत होते व तो बेशुद्ध पडलेला होता .त्याला मी लगेच मित्रांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी रोहित हा सिरीयस असल्याचे सांगितले. त्यामुळे लगेच त्याला  जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे रेफर केले . त्यानंतर वाशिम च्या सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की रोहीतची तब्येत खूप सिरीयस आहे .त्यामुळे आम्ही रोहितला लाईफ लाईन हॉस्पिटल वाशीम येथे भरती केले असून तो सध्या बेशुद्ध अवस्थेत आहे. माझा भाऊ रोहित पवार हा लाईफ लाईन हॉस्पिटल येथे भरती असून त्याला जीवाने ठार मारण्याचे उद्देशाने शुभम सुभाष चव्हाण याने लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे शुभम सुभाष चव्हाण वय २२ वर्ष राहणार लहुजी पुतळ्याजवळ मालेगाव यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारच्या रिपोर्टवरून व वैद्यकीय अहवालावरून मालेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 109, ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम ३  ( २ ) , ( V ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एसडीपीओ साहेब वाशिम यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button