सध्या देशात लोकशाहीचा उत्सव सूरू आहे. लोकसभा निवडणूकीत आज व पुढील दोन टप्प्यात मतदान होणार

सध्या देशात लोकशाहीचा उत्सव सूरू आहे. लोकसभा निवडणूकीत आज व पुढील दोन टप्प्यात मतदान होणार असून आपल्या गु्रप सदस्यांनी कुटुंबातील सर्वाचें मतदान होईल यांची काळजी घ्यावी. माझी सर्व सदस्यांना नम्र विनंती की कारण न देता मतदाना जरूर जावे व आपला सेल्फी मला नक्की पाठवावा. हा संदेश दिला आहे आयुष्याचा ॠणानुबंध वधुवर केंद्र व्हॉटसअप गु्रपवर संचालक राहूल कुळकर्णी गेल्या तिन वर्षापासून ब्राम्हण समाजासाठी व्हाटसअप गु्रपच्या माध्यमातून काम करणारे राहूल कुलकर्णी यांचे आज दोन गु्रप कार्यरत असून १६०० च्यावर सदस्य गुजरात,मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून जॉईन झाले आहे. दोन टप्प्यात अतिशय कमी मतदान झाले होते. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वौतपरी प्रयत्न सूरू अशातच आतापर्यत जवळपास ३५० विवाह कुठलाही मोबदला न घेता जूळवत राहूल कुळकर्णी यांनी सदस्यांना वरील आवाहन केले आहे. त्यांना विश्वास आहे की कोणताही मोबदला घेता काम करत असल्याने या आवाहनाला सदस्य नक्की प्रतिसाद देतील असा विश्वास राहूल कुळकर्णी यांना वाटतो.



