देऊळगाव राजा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; ५४ दात्यांचे रक्तदान.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी. शंकर शिवरकर
देऊळगाव राजा:महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज देऊळगाव राजा येथे भव्य रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.डॉ. सुनील कायंदे यांच्या केंद्रात आयोजनहे शिबीर सिव्हील कॉलनी, रेस्ट हाऊसच्या बाजूला असलेल्या ‘श्री डायग्नोस्टिक सेंटर’ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीया प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक केले.आयोजकांचे विशेष परिश्रमया यशस्वी उपक्रमाचे आयोजन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान (बुलडाणा जिल्हा) आणि भारतीय जनता पार्टी, सिंदखेडराजा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.



