खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा येथे उपनगराध्यक्ष वनिता भुतडा यांच्या हस्ते दिमाखात ध्वजारोहण संपन्न

सार्वजनिक वाचनालय परिसरात राष्ट्रीय सण उत्साहात साजरा; नागरिकांची मोठी उपस्थिती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा :येथील जुनी नगरपरिषद सार्वजनिक वाचनालय परिसरामध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देऊळगाव राजा शहराच्या उपनगराध्यक्ष सौ. वनिता राजेश भुतडा यांच्या शुभहस्ते शासकीय रीतीने मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.

सकाळी निश्चित केलेल्या शुभमुहूर्तावर उपनगराध्यक्ष सौ. वनिता भुतडा यांनी तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाला मानाची वंदना दिली. या दिमाखदार सोहळ्यादरम्यान उपस्थित सर्वांनी एका सुरात राष्ट्रगीत गायन करून भारतमातेला नमन केले. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी संपूर्ण वाचनालय परिसर आणि देऊळगाव राजा शहर देशमय झाले होते.

याप्रसंगी बोलताना उपनगराध्यक्ष सौ. वनिता भुतडा यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर क्रांतीकारकांचे व महापुरुषांचे स्मरण करून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

या सोहळ्याला शहरांमधील विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालय प्रशासनाने व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button