देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात २०० मीटर ‘नो पार्किंग’ नियमाची कडक अंमलबजावणी; एस टी महामंडळ आणि पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी;– शंकर शिवरकर
देऊळगाव राजा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी ३० जून २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग’ नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात पोलीस प्रशासन व एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने विशेष कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान देऊळगाव राजा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एस. जी. गायकवाड, रवि अवचार तसेच पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे डिघोळे यांनी बसस्थानक परिसराची पाहणी करून २०० मीटर ‘नो पार्किंग’ क्षेत्रात नियमबाह्य पद्धतीने उभी करण्यात आलेली खासगी वाहने, अनधिकृत प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
शासनाच्या निर्देशानुसार बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात कोणत्याही खासगी वाहनास प्रवासी चढविणे, उतरविणे अथवा वाहन उभे करणे प्रतिबंधित आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येत असून, ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पोलीस प्रशासनाने सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. व तसेच एसटी महामंडळाच्या वतीने प्रमुख मागणी पोलीस ठाणेदार श्री ब्रह्मगिरी साहेब यांना करण्यात आले आहे
1) बस स्टॅन्ड मध्ये एक पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावे
बस स्टँड परिसर मध्ये होणारे चोरी व छेडकानी जेणेकरून आळा घालता येईल त्या उद्देशाने अशी मागणी जळगाव राजा बस स्थानक एसटी डेपो च्या वतीने करण्यात आली आहे
या दरम्यान एस टी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक, श्री संजय गायकवाड, वाहतूक पोलीस कर्मचारी श्री. दिघोळे साहेब,रवी अवचार, आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कारवाई करण्यात आले



