खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक
जे.ई.स्कूल, मुक्ताईनगर येथे सामूहिक पसायदान गायन संपन्न

जे.ई.स्कूल ,मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर येथे नुकतेच 15 ऑगस्ट 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीत व राज्य गीताचा सराव करण्यात आला .
त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन आदेशानुसार संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या सप्तशतकोत्तर जयंती महोत्सवी वर्षानिमित्त सामूहिक पसायदान घेण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही.एम.चौधरी सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.बी.वंजारी यांनी करून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी अधिक माहिती विषद केली.सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक व्ही.एम.चौधरी सर उपमुख्याध्यापिका व्ही.के.शिर्के पर्यवेक्षक व्ही.डी.ब-हाटे ,एस.पी.राठोड, के.आर.कवळे तसेच ज्येष्ठ शिक्षक एस.एम.वाढे , सौ.आर.व्ही.महाजन , सौ.वाय.एस.पाटील , एस.बी.वंजारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,संत मुक्ताई यांच्या वेषभूषत विद्यार्थ्यांकडून सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात आले.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



