दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ११ लाखांच्या मदतीचा हात… खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा स्तुत्य पुढाकार..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :गजानन तांगडे, खामगांव
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगावची वार्षिक सर्वसाधारण सभा (आमसभा) आज स्व. विलासराव देशमुख कृषी संकुल (TMC यार्ड), येथे सभागृहात पार पडली.यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेत विविध विषयांवर चर्चा केली व सभासदांच्या सूचना, मते आणि बाजार समितीच्या पुढील कामकाजासंदर्भात विचारविनिमय केला.तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना मदत मिळावी या उद्देशाने सर्वानुमते कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगावच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर यांच्या कडे सुपूर्द करत संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येत बाजार समितीने सामाजिक बांधिलकी जपली आहे.याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समन्वयक श्री. ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद व संबंधित मान्यवर उपस्थित होते.



