बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दुर्गादैत्य गावकऱ्यांचा सुटकेचा श्वास! समाजभूषण तथागत भाई आंबोरे च्या धडक आंदोलनानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.

दी.२८/९/२०२६.

संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य गावातील नागरिकां च्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनलेली जीर्ण पाण्याची टाकी अखेर पाडण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. महाराष्ट्र समाज भूषण’तथागत भाई अंभोरे यांनी यांनी काही दिवसापूर्वी केलेल्या धडक आंदोलनानंतर प्रशासनाने याची दखल घेतली असून, संबंधित यंत्रणेमार्फत ही टाकी पाडण्याची कारवाई प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे.

मोबाईल टावर वर चढून केले होते आंदोलन.
दुर्गादैत्य येथील पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण व धोकादायक झाली होती. ही टकी तात्काळ पडण्यात यावी. यासाठी तथागत भाई अंभोरे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरवठा केला होता. मात्र, प्रशासनाकडून दीरगाई होत असल्याने त्यांनी काही दिवसापूर्वी चक्क बी एस एनएल मोबाईल टॉवर वर चढून तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

घटनास्थळी अधिकारी व कर्मचारी दाखल.
आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने संबंधित विभागाशी तातडीने समान समन्वय सधला, या संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आवश्यक यंत्रसामग्री व जेसीबी सह दुर्गादैत्य गावात दाखल झाले. गावकऱ्यांच्या उपस्थितीत या जीर्ण आणि धोकादायक ठरणाऱ्या पाण्याच्या टाकीला पाडण्याचे काम सुरक्षितपणे सुरू करण्यात आले.

गावकऱ्यांनी मानले आभार.
या धोकादायक टाकीमुळे गावात मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. प्रशासनाने कारवाई सुरू केल्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून तीव्र समाधान व्यक्त केले आहे. तथागत भाई आंबोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळेच हा प्रश्न निकाली निघाल्याची भावना त्यांच्या समर्थकांनी व गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लोकांच्या प्रश्नासाठी नेहमीच लढा देत राहू”, असा निर्धार यावेळी आंबोरे यांच्या कडून व्यक्त करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button