बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्रीक्षेत्र बरसाना येथे प.पू. श्री आगाशे काका माऊलींचा १८ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न; भाविकांची अलोट गर्दी

मा.आ. राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सहपरिवार घेतले दर्शन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:गजानन तांगडे, खामगांव

परमपूज्य श्री आगाशे काका माऊली (कृष्णानंद सरस्वती)यांच्या १८ व्या पुण्यस्मरण निमित्त अमुतनगर भागातील श्रीक्षेत्र बरसाना येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यास खामगावसह परिसरातील तसेच बाहेरगावहून आलेल्या हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी काकडा आरती, काकाच्या समाधीवर पवमान महाभिषेक तसेच श्री गोपाल सहस्त्रनामाचे जपानुष्वान करण्यात आले. सकाळी 8.30 ते 10.30या वेळेत ‘श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये, श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र गाया’ पाराथण झाले. सकाळी 10.30 वाजता नैवेद्य आरती झाल्यानंतर दुपारी 12वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली.प.पू. काका माऊली यांच्या समाधीच्या दर्शनासाठी हजारो गुरुबंधू-भगिनींनी श्रीक्षेत्र बरसाना येथे गर्दी केली होती.श्रीक्षेत्र बरसाना येथे समाधींचे दर्शन घेताना मा.आ. राणा दिलीपकुमार सानंदा व सहपरिवार.
कार्यक्रमाला उपस्थिम मान्यवर
या वेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते मा. आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ. अलकादेवी सानंदा, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांनी बरसाना येथे जाऊन काका माऊलींच्या समाधींचे पूजन करून दर्शन घेतले.माऊलींच्या समाधीसमोर मा. आ. राणा दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ. अलकादेवी सानंदा,माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा व मान्यवर यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते पंजाबरावदादा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, संतोष आटोळे, सुरेंद चव्हाण हे उपस्थित होते.प.पू. आगाशे काका माऊली यांच्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मा. आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button