खानदेशमहाराष्ट्रविदर्भ

गुरुवारी (१ ऑक्टोंबर) डाक अदालत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. २८ : टपाल सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारींचे योग्य प्रकारे निराकरण करण्यासाठी बुलढाणा डाक विभागाच्या वतीने दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. अधीक्षक डाकघर, बुलढाणा विभाग, बुलढाणा यांच्या कार्यालयात ही डाक अदालत होणार आहे. पोस्टाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजाबाबतच्या ज्या तक्रारींचे निवारण अद्याप झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारी डाक अदालतीमध्ये दाखल करता येणार आहेत.

विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर यांसंबंधीच्या तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे. तक्रारदारांनी तक्रारीचा संपूर्ण तपशील, संबंधित कागदपत्रे तसेच यापूर्वी तक्रार पाठविली असल्यास तिचा संदर्भ नमूद करावा.

तक्रारदारांनी आपली तक्रार गजेंद्र ना. जाधव, अधीक्षक डाकघर, बुलढाणा विभाग, बुलढाणा-४४३००१ यांच्या नावे दोन प्रतींमध्ये दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रीतीने प्रत्यक्ष अथवा टपालाद्वारे पाठवावी. तक्रारी spbldn.mah@gmail.com या ई-मेलवरही पाठविता येतील. डाक सेवेबाबतच्या प्रलंबित तक्रारींचे जलद व समाधानकारक निराकरण करण्यासाठी नागरिकांनी या डाक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बुलढाणा विभागाचे अधीक्षक डाकघर गजेंद्र ना. जाधव यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button