जळगावा जिल्हाजामनेर

जामनेर पोलिसांची मोठी कारवाई; चोरी आणि घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा पर्दाफाश!

रोख चोरीप्रकरणी चोरट्यांना अटक; ७० हजारांसह मोटारसायकल जप्त!

मदनीनगरातील ९ लाख २३ हजारांच्या घरफोडीचा उलगडा; दोन्ही गुन्ह्यातील चौघांना मुद्देमालासह अटक

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६ लाख २४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत!

Anch : जामनेर पोलिसांनी चोरी आणि घरफोडीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा करत चार संशयित आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

पहिल्या प्रकरणात एका घरातून ७० हजार रुपये रोख चोरीला गेले होते. या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी आरिफखान लालखान कंजर आणि मुबारिक अली खान या दोघांना अटक केली. आरोपींकडून चोरीची ७० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली नंबर प्लेट नसलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या प्रकरणात मदनीनगर येथील एका घरातून तब्बल ९ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी मोहम्मद फातीर उर्फ गोलू मिया तेफुल मोहम्मद आणि शेख अमीर शेख जाकीर या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी या प्रकरणात ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदीचे दागिने, ७१ हजार ५०० रुपये रोख आणि तीन मोबाईल असा एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जामनेर पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गुन्ह्यांचा तपास करून चार संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button