Uncategorized
ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे……

ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे……
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर
आजच्या काळात महाराष्ट्राने खूप प्रगती केली. समृद्धी महामार्गासारखे मोठ मोठाले प्रोजेक्ट महाराष्ट्रात येऊन सुखकर करून गेले. परंतु आजही काही हायवेच्या बाजूला सर्विस रोड मात्र अजूनही तसाच असतो. कारण जसा निधी असतो तसे काम असते. तसाच काहीसा प्रकार येथूनच जवळ असलेल्या जुईनगर स्टेशन पासून ते तुर्भे पर्यंत असलेल्या सर्विस रोडला ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यामुळे येथे वाहतूक करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. परंतु याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रत्येक जण ऑटो चा वापर करतो. वयस्कर वृद्धांना यामुळे कंबर दुखीचा त्रास वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.



