Uncategorized

दि.14 नोव्हेंबर 2024, छत्रपती संभाजीनगर अलोट गर्दीत, प्रचंड प्रतिसादात.. देशाचे यशस्वी आदरणीय पंतप्रधान मा. श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांची विराट जाहीर सभा संपन्न!!

महायुती सरकार आल्यानंतर सर्वात मोठी परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आली आहे. त्याचा लाभ प्रत्येक क्षेत्राला झाला.. येणाऱ्या काळात अनेक मोठ्या कंपन्या आणि उद्योग येथे येतील, या ठिकाणी सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे..

यामुळे छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील हजारो युवकांना आपल्या भागात रोजगार प्राप्त होईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे. मराठवाड्यात पाण्याचा एवढे मोठे संकट असताना जे काम साठ वर्षांमध्ये होऊ शकलं नाही ते केंद्रातील एनडीए आणि राज्यातील महायुती सरकारने करून दाखवले आहे, असे मा.पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात आवर्जून सांगितले..

महायुती सरकारने जी कामे केली ती अभूतपूर्व आहेत. महायुती सरकारच्या योजना सर्वसमावेशक तर आहेतच पण त्या समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यात सरकारला यश लाभले आहे.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या गतिमान महायुती सरकारला पुन्हा एकदा बळकट करणे गरजेचे आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button