Uncategorized

जिल्हा दुध संघामध्ये वाद दोन जणांनी केली कर्मचाऱ्याला मारहाण

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी रणधीर पवार

| १ ऑगस्ट २०२४

जळगाव जिल्हा दूध संघामध्ये दारूच्या बाटल्या नेण्यास नकार दिल्याने दोन जणांनी कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना मंगळवार दि. ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दूध संघ परिसरात घडली. या प्रकरणी रात्री ९.३० वाजता ५ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, याबाबत अधिक माहिती अशी की, संजय छगनलाल पाटील, मोहन रुपवते हे दूध संघात मंगळवार दि. ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मद्याच्या बाटल्यासोबत घेऊन आल्याने त्या दोघांना आत जाण्यास योगेश भागवत निंबाळकर (वय ४१, रा. जळगाव) यांनी नकार दिला. त्यावेळी दोघांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालून निघून गेले. त्यानंतर वरील दोघे जण मद्यपान करून त्यांच्यासोबत तीन जण घेऊन आले. त्यांनी वाद घालत योगेश निंबाळकर यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी योगेश निंबाळकर यांनी रात्री ९.३० वाजता शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय पाटील, मोहन रुपवते, राजू पाटील व इतर दोन जण (नाव समजू शकले नाही) अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button