कारचालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे कार ट्रकवर आढळली एकाचा जागीच मुत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव। उज्जैन येथून दर्शन घेऊन परतीचा प्रवास करित असताना आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास नांदुरा तालुक्यातील बडनेर भोलजी गावाजवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे
समोरच्या ट्रकवर आदळली या घटनेत एकाचा जागीच मृत्यू
तीघे जखमी झाले आहेत. घटनेबाबत सविस्तार असे की,
येथील रहिवासी रोशन अপিল ठाकरे (२२), अक्षय वसंता
कळसकार रा. सुटाळा खुर्द, अमन पुरवार (२२) रा.भाटीया लेआऊट खामगाव व प्रतिक कैलास अवधुत (कारचालक रा. शेगाव) हे चौघेजण उज्जैन येथे कार क्रमांक एमएच १४ एफसी ०२८४ ने दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात आज २८ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता सुमारास नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार समोरच्या ट्रकवर धडकली. या अपघातात रोशन अनिल ठाकरे याचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक प्रतीक अवधुत गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नांदुरा येथील ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर व सहकारी तसेच जखमींना नांदुरा येथील प्रा.आ. केंद्रात दाखल केले. चालक प्रतिक अवधुत याची प्रकृती उपचाराला साथ देत नसल्यामुळे त्याला जीएमसी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.



