आमदार संजय कुटे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांना मोफत किचन सेट वाटप संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस संग्रामपुर तालुका प्रतिनिधी भगवान पाखरे
स्थानिक वरवट बकाल येथील सहकार विद्या मंदिराच्या हॉलमध्ये तारीख 28 /9/2024 मोफत किचन सेट चे वाटप करण्यात आले ज्या कामगार बंधू भगिनींनी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन केले त्यांना मोफत किचन सेट चे वाटप करण्यात आले ज्या बंधू-भगिनीचे बायोमेट्रिक नोंदणी बाकी असेल त्यांनी तीस तारखे नंतर बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन करून नोंदणी करून घ्यावी त्यांना हतवाहात किचन सेट चे वाटप करण्यात येईल या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली यावेळी आमदार संजयजी कुटे साहेब यांनी आपल्या भाषणातून सांगितले माझ्या लाडक्या बहिणीचे तिसरा हप्ता पण आजच जमा झाला या योजनेसाठी विरोधक यांनी ही योजना बंद पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु ही योजना कदापिही बंद पडणार नाही कारण माय माऊलींच्या आशीर्वादाने लहान थोरांच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार स्थापन होणार मग ही योजना बंद पडण्याचा प्रश्नच नाही विरोधक हे अपप्रचार करीत आहेत शिवाय आमदार साहेब यांनी आपल्या भाषणातून पोलीस बांधव व कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तबद्ध किचन सेट चे वाटप करण्यासाठी मदत करावी सर्वप्रथम वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेचे आमदार डॉक्टर संजय कुटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार डॉक्टर संजय जी कुटे साहेब डॉक्टर किशोरजी केला साहेब यांनी मार्गदर्शन केले प्रस्ताविक डॉक्टर गणेश जी दातीर साहेब यांनी केले सूत्रसंचालन पण डॉक्टर दातीर साहेब यांनी केले यावेळी मंचावर प्रामुख्याने भारत भाऊ वाघ शांताराम जीदाणे शिवसेना जिल्हाप्रमुख पांडुरंग जी हागे भाजपा तालुका अध्यक्ष लोकेश भाऊ राठी कैलास जी कडाळे राजेंद्र मुयंडे सुधाकर शेजुळे पवन अस्वर प्रमोद जी गोसावी पद्माकर मोरे पंकज भाऊ कड यांची उपस्थिती होती किचन सेट चे वाटप करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रामुख्याने ज्ञानदेव रावजी भारसाकडे आमदार संजयजी कुटे साहेब यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश भाऊ राऊत पद्माकर मोरे राजू मुयांडे पांडू भाऊ इंगळे यांनी परिश्रम घेतले ✍️



