
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
आज श्रीसंत नगरी शेंगाव येथे माविम महिला आर्थिक विकास महामंडळ व परिवर्तन लोकसंचिलत साधन केंद्र शेंगाव अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गट उद्योजक मेळावा शिवसेना नेते खासदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यामध्ये ९०५ बचत गटांना निर्धुर शेगडी वाटप व सहाशे महिलांना प्रत्येकी १५००० हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले.
यानंतर अध्यक्षीय भाषणातून खासदार प्रतापराव जाधव यांनी अभियानामार्फत मंजूर निधीतून करता येणारे व्यवसाय, अभियानाचे पुढील नियोजन तसेच उत्पन्न वाढीबाबत मार्गदर्शन केले सर्व महिलांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्याबाबत सर्व कॅडर व कर्मचारी याना सूचना केल्या.तसेच अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत वाढविणेबाबत व मी केंद्रीय ग्राम विकास समितीचा अध्यक्ष असताना देशभरातील ब-याच राज्यातील महिला बचत गटांचा अभ्यास केला असता असे लक्षात आले कि, महिलानी बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेवर भरतात व त्या पैश्यातून जो उद्योग उभा करतात त्याच्या उत्पादनही दर्जेदार असते परंतु त्यांनी तयार केलेल्या मालाला विक्री व्यवस्था व विपणन प्रणाली नसल्यामुळे त्या महिलांचे उद्योग बंद पडतात किंवा विस्कळीत होतात त्यावरच तोडगा म्हणून जिल्ह्यातील यापूर्वी भूमिपूजन झालेल्या तालुक्यात तालुका पातळीवर कायमस्वरूपी विक्री केंद्राचे बांधकाम दिवाळी पर्यन्त पूर्ण होईल लवकरच साठ लाख रुपये किमतीचे कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू करण्याचा तसेच समूहांनी ऍमेझॉन, फ्लिपकार्ट च्या माध्यमातून ऑनलाईन प्लॅटफॉर्म समूहांना मिळून देण्याचा मानस व्यक्त केला.
तसेच जिल्ह्यातील समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जिल्हा पातळीवर मॉल उभारण्याचे नियोजन केले आहे व त्याच उत्पादनांचे जिल्ह्यासाठी एकच ब्रँड ही संकल्पना अस्तित्वात आणणार, तसेच तालुक्यातील योजना उपक्रम सक्षम करण्यावर भर देण्याबाबत आश्वासन दिले. तसेच समूहातील महिलांना उद्योग व्यवसाय विषयक अडचणी येऊ नये म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्याबाबत नियोजन उपजीविका मदत कक्षा मार्फत करण्यात आल्याची माहिती दिली.
सर्व कॅडर व महिलांनी याचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.
यावेळी माविम जिल्हा समन्वय अधिकारी मा.सुमेध तायडे,माविम जिल्हा उप समन्वयअधिकारी मा.समिर देशमुख,शिवसेना जिल्हा प्रमुख मा.शांताराम दाणे,
मा.ज्ञानेश्वरदादा पाटील,शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर,समन्वय डॉ.अभिषेक भराड,मा.राहुल सोळंके, मोहन लांजुळकर उपतालुकाप्रमुख , आशिष मिरगे उपतालुकाप्रमुख , शैलेश डाबेराव नगरसेवक, अमोल जवंजाळ विभाग प्रमुख, स्वाती पहुरकर महिला आघाडी, सुनीता पिसे, वनिता बाभुळकर, मयुरी शेजोळे,महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक अधिकारी बुलढाणा श्री सुमेध तायडे , परिवर्तन लोक संचालित साधन केंद्र शेगांव व्यवस्थापिका योगिता पाटील व अन्य माविम चे अधिकारी व महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



